Ad will apear here
Next
नरवीर तानाजी वाडी येथे सामूहिक अथर्वशीर्ष पठण
पुणे : नरवीर तानाजी वाडी येथील नरवीर तानाजी तरुण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मंगळवारी (१८ सप्टेंबर) महिलांचे सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. ‘ओम नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि’ या पवित्र मंत्रोच्चारात २०० हून अधिक महिलांनी सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण करून गणरायाची आराधना केली.

यामध्ये वडगाव धायरी येथील डीएसके गणपती अथर्वशीर्ष मंडळ, सप्तसूरच्या उज्ज्वला जोशी, संध्या बासुतकर, कल्पना लाकवाले, छाया कोतवाल, प्रतिभा जोशी, हेमा आठल्ये. ज्योती मनगोली, उमा टिंगरे यांच्यासह नरवीर तानाजी वाडी परिसरातील २०० हून अधिक महिलांनी १८ सप्टेंबरला सायंकाळी सामुहिक अथर्वशीर्ष पठण करून नरवीर तानाजी वाडीचा परिसर मंत्रोच्चारांनी चैतन्यमय केला.

या प्रसंगी आमदार अनिल भोसले, नगरसेविका रेश्मा भोसले, श्रीधर वाघ, आबा भोसले, दीपक पवार, गणेश जाधव, अमित पाचुंदकर, ओंकार महाडिक, गोपाळ देशमुख, बाळासाहेब बढे, एकनाथ ताम्हाणे, वसंत सावंत, अनिता शहाणे, मनीषा देशमुख, रोहिणी वाघ आदी उपस्थित होते.

सामूहिक अथर्वशीर्ष पाठणामध्ये सहभागी महिलांचा ओटी भरून सन्मान करण्यात आला; तसेच त्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या. भक्ती वाघ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.      
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZNJBS
Similar Posts
नरवीर तानाजी तरुण मंडळातर्फे भव्य देखावा पुणे : नरवीर तानाजी वाडी येथील नरवीर तानाजी तरुण मंडळातर्फे शिर्डी येथील साईबाबा यांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा २५०० फूट जागेत साकारण्यात आला होता. दिव्य स्वरूपात उभारलेल्या या देखाव्यातून भाविकांना प्रत्यक्ष साईबाबांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
आमदार भोसले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा पुणे : आमदार अनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या दळवी रुग्णालयात गरोदर महिला व नवजात बालकांच्या नावाने विमा पॉलिसी नोंदणी व वितरण करण्यात आले. नरवीर तानाजी वाडी येथील नरवीर तानाजी तरुण मंडळ, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, नरवीर ग्रुप, कट्टा ग्रुप, श्रीकृष्ण मित्र मंडळ, गोळी ग्रुप व खैरेवाडी
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language